शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! या दिवशी जमा होणार पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Yojana: आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. आपल्या देशातील शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी सरकार विविध योजना राबवत असते. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत देते. या योजना अंतर्गत आत्तापर्यंत 17 हप्त्याचे वितरण झाले आहे. आता शेतकरी अठरावा हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. नेमकी हा 18 वा हप्ता कधी मिळणार याबाबत सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पी एम किसान योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

18वा हप्ता कधी जमा होणार?

शेतकऱ्यांच्या आर्थिक खर्चला हात भर लावणारे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी शेतकरी आता अठराव्या हप्त्याची वाट पहात आहेत. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये आर्थिक सहाय्य देते. हा हप्ता वर्षातील तीन टप्प्यांमध्ये दोन हजार रुपये याप्रमाणे दिला जातो. अठराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये ऑक्टोबर मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे. PM Kisan Yojana

पॅन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर हे जाणून घेणे महत्त्वाचे..

18वा हप्ता मिळवण्यासाठी लगेच करा हे काम

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार यावेळी शेतकऱ्यांना काय नवीन सूचनेचे पालन करावे लागणार अठराव्या हप्त्याच्या लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी आणि जमीन पडताळणी करणे आवश्यक ज्या शेतकऱ्यांनी या आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्या नाही त्यांना अठराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळणार नाही. त्यामुळे 18 व्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर लगेच शेतकऱ्यांनी ही कामे पूर्ण करून घ्यावीत.

लडकी बहीण योजनेचे 50 हजार महिलांना मिळणार नाहीत पैसे, अपात्र महिलांची यादी पहा

ई-केवायसी कशी करावी?

शेतकरी मित्रांनो ई-केवायसी करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. त्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. होम पेजवर ई केवायसी या पर्यायावर क्लिक करून विचारलेली सर्व माहिती भरून गेट ओटीपी या पर्यायावर क्लिक करावे लागेल. ओटीपी टाकून तुम्ही तुमची ई केवायसी पूर्ण करू शकता. या शिवाय शेतकरी त्यांच्या जवळच्या कॉमन सर्विस सेंटर सीएससी केंद्रात भेट देऊन बायोमेट्रिक केवायसी किंवा स्वतः ओटीपी द्वारे ई कवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

असाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!