Panjabrao Dakh Havaman Andaj: महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाची बॅटिंग जोरदार सुरू होणार आहे. ज्येष्ठ हवामान अभ्यासात पंजाबराव डख यांनी एक नवीन अंदाज वर्तवला आहे. पंजाबराव यांनी सांगितल्याप्रमाणे नवीन हवामान अंदाज महाराष्ट्रात जवळपास 10 ते 12 दिवस सलग मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. मागील काही दिवसापासून महाराष्ट्रात हवामान कोरडे होते. सप्टेंबर च्या सुरुवातीला पाऊस वर असल्यानंतर पावसाने विश्रांती घेतली आहे.
पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफीची यादी गावानुसार जाहीर, यादीत तुमचे नाव तपासा
आधार कार्डबाबत नविन नियम लागू , या नागरीकांच्या अडचणी वाढणार…
पंजाबराव डख यांच्या मते कोणत्या जिल्ह्यात होणार पाऊस?
पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होणार आहे. पण या काळात राज्यातील उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात जास्त प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागातील लातूर, नांदेड, परभणी, सांगली, सातारा, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, कोकण, अहमदनगर, पुणे, बीड या भागात पावसाची जास्त शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या जिल्ह्यामधील काही भागात वादळी वारा आणि अतिवृष्टीचा पाऊस देखील होऊ शकतो. यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी आपले लवकरात लवकर काम आवरून आपले शेती पीक सुरक्षित ठिकाणी आणून ठेवावे. कारण या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा पाऊस होण्याची शक्यता पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सावध राहणे आवश्यक आहे.