Panjabrao Dakh Havaman Andaj: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्यात सध्या सोयाबीन काढणी चालू आहे. अशा परिस्थितीत पाऊस पुन्हा एकदा सुरू झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तनात येत आहे. ज्येष्ठ हवामान अभ्यासात पंजाबराव डख यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक नवीन अंदाज दिला आहे. राज्यात पुढील तीन दिवस कोणत्या भागात अतिवृष्टी होणार तर कोणत्या भागात मुसळधार पाऊस होणार याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
👇👇👇👇
पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात 25-27 सप्टेंबर दरम्यान राज्यातील विदर्भ भागातील पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील जिल्ह्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. म्हणजेच या काळात विदर्भात सर्व भागात पाऊस पडणार नाही. भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात 27 तारखेपर्यंत जोरदार पाऊस होण्याच शक्यता आहे. मराठवाडा सोबतच उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र देखील 27 सप्टेंबर पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
👇👇👇👇
या भागात होणारा अतिवृष्टी
पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार अक्षरशा काही भागामध्ये अतिवृष्टी देखील होणार आहे. डख यांच्या अंदाजानुसार राज्यातील अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, वर्धा या जिल्ह्यांमध्ये 27 तारखेपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे. परंतु नांदेड, लातूर, बीड, उस्मानाबाद, परभणी, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, कोकण, मुंबई, नाशिक या भागात जोराचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
👇👇👇👇
उत्तर महाराष्ट्रात म्हणजेच अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यामध्ये या काळात पावसाची तीव्र शक्यता वर्तवण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा, मालेगाव, देवळा, मनमाड याबाबत जोराचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागातील शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा पंजाबराव डख यांनी दिला आहे. Panjabrao Dakh Havaman Andaj
👇👇👇👇
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक मुंबई पुणे ठाणे कोकण संभाजीनगर मालेगाव सातारा सांगली कोल्हापूर या भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील तीन दिवस शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात विजेच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्याने आपले जणारे झाडाखाली बांधण्याचे टाळावे व पावसात झाडाखाली उभे राहणे टाळावे असे आव्हान करण्यात आले आहे.