Mukhymantri Annpurna Yojana: राज्यातील गरीब कुटुंबातील नागरिकांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रातील महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी केले आहे. त्यामुळे आता महिलांना स्वयंपाकासाठी चुलीपुढे धूर फुकट बसायची गरज भासणार नाही कारण राज्य सरकारतर्फे महिलांना एका वर्षात तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार मोहोळ मधील जनसंवाद यात्रेमध्ये अजित पवार बोलताना म्हणाले आता एकदम पारदर्शक कारभार आहे भ्रष्टाचाराची भानगडच नाही.