या दिवशी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता खात्यात जमा होणार?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mukhymantri Ladki Bahini Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा जुलै महिन्यात करण्यात आली होती. या योजने अंतर्गत जुलै आणि ऑगस्ट दोन हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याकडे महिलांचे लक्ष लागून राहिले आहे. हा तिसरा हप्ता सप्टेंबर महिन्यात महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. तो नेमका महिलांच्या खात्यात कधी जमा होणार? हप्ता जमा होण्याची नेमकी तारीख काय असणार आहे? आणि किती रुपये खात्यात जमा होणार आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आज जाणून घेणार आहोत.

👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची पात्र महिन्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लाडकी बहीण योजनेची घोषणा जुलै महिन्यात करण्यात आली होती त्यावेळी अनेक महिलांना तात्काळ कागदपत्राची जुळवा जुळवी करता आली नाही. त्यामुळे त्या महिलांना 31 जुलै पर्त अर्ज करता आले नाहीत. अशा महिलांना ऑगस्ट महिन्यात अर्ज करावे लागले. त्यामुळे या महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले नव्हते. नवीन मिळालेल्या माहितीनुसार आता नवीन अर्ज करणाऱ्या महिलांच्या खात्यात एकत्रित 4500 रुपये जमा होणार आहेत.

👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची पात्र महिन्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

किती पैसे जमा होणार?

ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला आणि त्यांचा अर्ज मंजूर झाला त्यांच्य खात्यात आता सप्टेंबर महिन्यात पैसे येणार आहेत. या महिलांच्या खात्यात जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्याचे मिळून एकत्रित चार हजार पाचशे रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. कारण या महिलांना जुलै महिन्याचा लाभ मिळाला नव्हता आणि त्यामुळे आता या महिलांना तिन्ही महिन्याचे एकत्रित चार हजार पाचशे रुपये मिळू शकतात.

ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे तीन हजार रुपये मिळाले आहेत. त्या महिलांना सप्टेंबर महिन्यात फक्त एका महिन्याचे 1500 रुपये मिळणार आहेत. Mukhymantri Ladki Bahini Yojana

कोब्रा विरुद्ध वाघ हा सामना बघून तुमच्याही अंगाला फुटेल घाम, व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

तिसऱ्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार?

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा तिसरा हप्ता 17 ते 19 सप्टेंबर पर्यंत महिलांनी बँक खात्यात जमा होऊ शकतो. सरकारकडून याबाबत अजून कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र या तारखे दरम्यान पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्याचा अंदाज आहे.

घरबसल्या नवीन पॅन कार्ड तयार करा, एकदम मोफत, असा करा ऑनलाइन अर्ज

या महिलांना मिळणार फक्त 1,500 रुपये

ज्या महिलांनी सप्टेंबर मध्ये लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला आहे. त्या महिलांना फक्त सप्टेंबर महिन्या पासून लाभ मिळणार आहेत. त्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा होणार नाहीत. त्याचबरोबर अर्ज भरताना तुम्ही अंगणवाडी सेविकाकडे अर्ज भरला तरच तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार आहेत. कारण इतर पर्याय सध्या बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज फक्त अंगणवाडी सेविकाच करू शकतात.

पीएम किसान योजनेच्या 18 व्या हप्त्याचे पैसे ‘या’ दिवशी मिळणार, फक्त त्याआधी करा ‘हे’ 3 कामं..

माझी लाडकी बहीण योजनेमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये अनेक घोटाळे होत असल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर सरकारने नवीन अर्ज फक्त अंगणवाडी सेविकाकडेच भरता येणार हा निर्णय घेतला आहे. एका व्यक्तीने त्याच्या पत्नीच्या नावाने 30 अर्ज दाखल केले, त्यापैकी 26 अर्ज मंजूर झाले होते. अशाप्रकारे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा गैरवापर होऊ नये यासाठी राज्य सरकारने हे पाऊल उचलले आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!