रेशन कार्ड मध्ये नाव वाढवणे/कमी करणे, नवीन रेशन कार्ड कसे काढायचे? पहा रेशन कार्ड बद्दल सर्व माहिती


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New Ration Card Apply: नागरिकांना अनुदानित अन्नधान्य मिळण्यासाठी शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्रे आहे. महाराष्ट्रात रेशन कार्ड राज्य सरकार द्वारे जारी केल जाते व राज्य अन्न व नागरी पुरवठा विभागात द्वारे व्यवस्थापित केले जाते. महाराष्ट्रात राशन कार्ड साठी अर्ज करू इच्छिणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला महाराष्ट्र राज्याचा अन्न व पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागतो. रेशन कार्ड साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा याबद्दल सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत.

नवीन रेशन कार्डला ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

रेशन कार्ड साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?

तुम्ही देखील महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल आणि तुम्हाला नवीन शिधापत्रिका साठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही खाली स्टेप वापरून नवीन राशन कार्ड ला अर्ज करू शकता. New Ration Card Apply

नवीन रेशन कार्डला ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

  • महाराष्ट्र राज्याचे नवीन शिधापत्रिका साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही महाराष्ट्र राशन कार्ड च्या अधिकृत वेबसाईटवर mahafood.gov.in जावे लागेल.
  • वेबसाईटला आल्यानंतर तुम्हाला वेबसाईटच्या होम पेजवर मेनू कार्ड मध्ये दिलेल्या डाउनलोड लिंक वर क्लिक करावे लागेल.
  • महाराष्ट्र शिधापत्रिका अर्ज डाउनलोड या पर्यायावर क्लिक करा
  • डाउनलोड पर्यावरण क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन पेजवर रीडायरेक्ट केले जाईल या नवीन पानावर आल्यानंतर तुम्हाला नवीन शिधापत्रिका साठी अर्ज करावा लागेल.
  • Form 1: application for new ration card अंतर्गत दिलेल्या लिंक वर क्लिक करून नवीन रेशन कार्ड अर्ज डाऊनलोड करावा लागेल.
  • त्यानंतर फॉर्म पीडीएफ फाईल मध्ये डाऊनलोड केला जाईल. फॉर्म डाऊनलोड केल्यानंतर अर्जाची प्रिंट काढा.
  • यानंतर छापील अर्ज काळजीपूर्वक भरा. फॉर्म भरल्यानंतर त्याच्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडा.
  • आता वरील प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला तुमच्या जवळच्या अन्न व पुरवठा कार्यालयात जाऊन अर्ज सबमिट करावे लागेल.Food Supply Department

या दिवशी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता खात्यात जमा होणार?

कार्यालयात संबंधित अधिकाऱ्याने अर्ज तपासल्यानंतर तुमचा अर्ज स्वीकारला जाईल आणि सबमिट केला जाईल फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमचे रेशन कार्ड तुमच्या पत्त्यावर विभागाद्वारे पोस्टद्वारे वितरीत केले जाईल. अशा प्रकारे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे नवीन सुद्धा पत्रिकेसाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज करू शकता.

फॉर्म 8 : नाव जोडणे (नवीन नाव ऍड करणे) :- PDF FORM

फॉर्म 9 : नाव कमी करणे (नाव काढून टाकने) :- PDF FORM

फॉर्म 14 : शिधापत्रिकेत बदल करणे :- PDF FORM

फॉर्म 15 : डुबलीकेट राशन कार्ड बनवण्यासाठी अर्ज :- PDF FORM

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! या दिवशी जमा होणार पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता

नवीन राशन कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • निवासस्थानाच्या मालकीबद्दल पुरावा
  • LPG जोडनी असेल तर
  • विजेचे बिल
  • बँक पासबुक
  • ड्रायव्हिंग लायसन
  • मतदान कार्ड
  • आधार कार्ड
  • इतर शासकीय ओळखपत्र (कार्यालयीन/इतर)
  • अर्जदाराचे पासपोर्ट साईज फोटो
  • अर्जदाराचे जात प्रमाणपत्र

अशाच माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!